महाराष्ट्र

हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :-  २८ जुलै या जागतिक हिपेटायटिस दिनाचे औचित्य साधून हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व जिल्हा रुग्णालयात हिपेटायटिस तपासणी व उपचार सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते आज करण्यात आला.  येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार कॅप्ट. आर तमिल सेल्वन उपस्थित होते.

दरम्यान, हिपेटायटीस बद्दल अधिकृत माहिती व रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून  टोल फ्री क्रमांक १८००-११-६६६६ आज पासून सर्वत्र कार्यान्वित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या क्रमांकावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी स्वतः फोन करून उपचार व सेवेबाबत माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT