cabinet expansion issue eknath Shinde sick devendra Fadnavis in Delhi politics mumbai  sakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Fadnavis Delhi Tour: मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या! शिंदे-फडणवीस तातडीनं दिल्लीसाठी रवाना

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी हा दौरा असल्याचं बोललं जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना होणार आहेत. नेमक्या कुठल्या कारणासाठी ते दिल्लीला निघाले आहेत, हे कळू शकलेलं नाही. पण मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी हा दौरा होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. (Ekanth Shinde Devendra Fadnavis Delhi tour Maratha Reservation issue comes for discussion)

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, काही वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अद्याप या दौऱ्याचं कारण समोर आलेलं नाही, पण अचानक दिल्ली दौरा हा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. (Latest Marathi News)

जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु

दरम्यान, काल सरकारला दिलेली शेवटची मुदत संपल्यानं मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा आंतरवली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारनं वारंवार आश्वासनं देऊनही यंदा जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्यानं आता सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळं यावर केंद्र सरकारशी चर्चा करुन काही तोडगा काढता येतोय का? यासाठी त्यांनी दिल्लीकडे धाव घेतल्याचं बोललं जात आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघातून वगळले, म्हणून Rinku Singh पेटला! २४० च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी; समीर रिझवी, माधव कौशिक यांचेही अर्धशतक

Year End 2025: 'हे' हेल्थ ट्रेंड राहिले सर्वाधिक चर्चेत, जाणून घ्या काय आहे खास

Latest Marathi News Live Update : दत्तजयंती, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या संगमाला सुपरमून, आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार

Kolhapur News : दौलत-अथर्व कारखान्याकडून उसाला ३५०० दर जाहीर; स्वाभिमानींच्या सातत्यपूर्ण लढ्याला मिळाला यश

Indigo Emergency Landing : अहमदाबाद विमानतळावर 'इंडिगो' विमानाचे आपत्कालीन लँडिंग; बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT