Eknath Khadse Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : अजितदादांसारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी फडणवीसांची सही लागते ; खडसेंचा टोला

सकाळ डिजिटल टीम

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चिमटा काढला आहे.

यावेळी एकनाथराव खडसे म्हणले की, देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांची मानहानी करण्याचा प्रयत्न होत आहे. पवारांनी दिलेल्या आदेशाला फडणवीसांनी स्थागिती द्यावी हे तर अजित पवारांच्या अधिकारांवर मर्यादा आणण्या सारखं आहे.

यावेळी खडसे अजित पवारांना टोला लागावतांना म्हणाले कि, फडणवीस हे सिनियर उपमुख्यमंत्री आहेत तर अजितदादा हे जुनियर यामुळे अजितदादा यांच्यासारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी सीनियर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही लागेल.

खडसेंनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली यावेळी ते म्हणाले कि, मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री पद महाजनांना हवे होते. मात्र त्याना पालकमंत्री पद मिळणारच नाही हे त्यांना समजताच त्यांनी नाद सोडला.

इंडियाच्या मुंबईतील बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. यात मोठे निर्णय होऊ शकतात. यामुळे राजकारणाला नवीन दिशा मिळणार आहे. जनतेतली नाराजी एकत्र होऊन याचा फायदा इंडियाला होईल असे खडसे म्हणाले.

(हे वृत्त 'साम मराठी' वाहिनीने प्रकाशित केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT