Eknath Khadse Latest News esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : खडसे म्हणाले, पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत, 'हे' खातं सगळ्यात भ्रष्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी नगरविकास खात्यात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला.

एकनाथ खडसे म्हणाले की, टाऊन प्लॅन, डीपी प्लॅन करत असतांना त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग महाराष्ट्रात उपलब्ध नाही. त्यामुळे मग एजन्सीला काम दिलं जातं, त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. आपण डीपी प्लॅन तयार करत असतांना योग्य नियोजन होण्याची गरज आहे. हरकती कमीत कमी वेळेत कशा सुटतील, हे बघितलं पाहिजे.

खडसे पुढे म्हणाले की, टाऊन प्लॅनमध्ये कमी स्टाफ आणि प्रचंड भ्रष्टाचार सुरु झाला आहे. नगरविकास खातं सगळ्यात भ्रष्ट खातं झालं आहे. तिथे पैसे दिल्याशिवाय एकही काम होत नाही. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे खडसेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, विधान परिषदेचं आजचं कामकाज समाप्त झालं आहे. तत्पूर्वी उद्या सभागृहाचा कार्यक्रम काय असेल? याची माहिती सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्यानुसार, २५ जुलै २०२३ रोजी सकाळी 9.30 ते 11.45 या वेळेत सभागृहाची विशेष बैठक भरणार आहे.

या बैठकीत प्रस्तावांवर चर्चा आणि त्यावर मंत्र्यांची उत्तर होतील. त्यानंतर २१ जुलैच्या ८ आणि एक प्रलंबित अशा ९ लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक दुपारी १२ वाजता भरेल, अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT