Eknath Khadase  sakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Chaudhary : एकनाथ खडसे यांच्या जावयाची २ वर्षानंतर सुटका

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरिश चौधरी यांची तब्बल दोन वर्षानंतर तुरुंगातून मंगळवारी (ता.२५) सुटका झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरिश चौधरी यांची तब्बल दोन वर्षानंतर तुरुंगातून मंगळवारी (ता. २५) सुटका झाली आहे.

२०१६ मध्ये पुण्यात जमीनखरेदीसंबधीत प्रकरणात मनी लॉडंरीगच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. सर्व कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांना २१ जुलैला जामीन मंजूर केला होता.

मात्र त्यांच्या जामीनासंबधीची सर्व पुर्तता त्यांना पीएमएलये कोर्टात करावी लागली. ही प्रक्रीया मंगळवारी पुर्ण झाली.सर्वोच्च न्यायालयाने गिरिश चौधरी यांना काही अटी शर्तीवर जामीन दिला आहे.

यामध्ये त्यांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करावा लागेल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहवा लागेल. याशिवाय त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाता येणार नाही.

प्रकरण थोडक्यात

पुणे एमआययडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे दोन वर्षांपासून कोठडीत होते. भूखंड घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना जुलै २०२१ मध्ये अटक केली होती.

साल २०१६ मध्ये एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरींच्या नावाने भोसरी एमआयडीसीमध्ये खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत भूखंड खरेदी केल्याचा आरोप होता.

याप्रकरणी चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst Reason : उत्तरकाशीमध्ये ढगफुटी का झाली? धक्कादायक कारण आलं समोर, शास्त्रज्ञ म्हणाले लवकरच भारतात...

Jupiter Transit 2025: गुरुंचा कर्क राशीत प्रवेश; या ४ राशींवर ४९ दिवसांत धन, यश आणि संधींचा वर्षाव!

Ravikiran Ingavle : रविकिरण इंगवलेंसह ८० जणांवर गुन्हा, परवाना न घेता रॅली काढल्याचा परिणाम

Mumbai Kabutar Khana : कबुतरांमुळे इमारतींवर रासायनिक परिणाम, मुंबई शहराच्या अभ्यासातील माहिती; ३,५०० कबुतरे एकाच ठिकाणी

Latest Marathi News Updates Live : दादरमध्ये कबुतरखानाबंदी विरोधातील जैन समाजाचे आंदोलन मागे

SCROLL FOR NEXT