Kasba Bypoll Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kasba Bypoll Election : "कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी भाजपाला धूळ चारणार"

कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोधी करण्यासाठी भाजपचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. तर भाजपसोबत कसबा मतदारसंघात काँग्रेसही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आज नाना पटोले यांनी सांगितले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसही उमेदवार देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असून, चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच २०१६ रोजी मला राजीनामा द्यावा लागला. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात घडवून षड्यंत्र रचल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, 'कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत. स्वतः चार ते पाच दिवस तिथे प्रचार करणार आहे'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

Alandi Weddings : गुरू-शुक्राच्या अस्तामुळे आळंदीत विवाह मुहूर्त कमी, कार्यालय बुकिंगला थंड प्रतिसाद

SCROLL FOR NEXT