Eknath Shinde
Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड, पण प्राथमिक सुविधांची वाणवा; उच्च न्यायालय म्हणाले...

दत्ता लवांडे

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील खिरवंडी गावात दोन हेलिपॅड आहेत पण रस्ते, पूल, रूग्णालये आणि शाळा अशा प्राथमिक सुविधा नाहीत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या गावातील पूराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर उच्च न्यायालयाने (High Court) सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर सुनावणी झाली असून ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

(CM Eknath Shinde Village Helipad)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं सातारा जिल्ह्यातील खिरवंडी हे मूळगाव आहे. त्या गावात शाळा, रस्ते, वीज अशा प्राथमिक सुविधांची वाणवा आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पूराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोयना नदीतील पूराच्या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या मुली या व्हिडिओत दिसत होत्या. त्यानंतर उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सुमोटो याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गावातील मुलींचा शाळेतील जिवघेणा प्रवास थांबावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना उच्च न्यायलयाने दिल्या आहेत. त्याचबरोबर मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेऊन योग्य त्या साकारात्मक योजना राबवाव्यात आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव पदाच्या अधिकाऱ्याच्या प्रतिज्ञापत्रासह हा अहवाल ३० ऑगस्ट पर्यंत न्यायालयात सादर करावा अशा सूचना न्यायलयाने दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या गावात या प्राथमिक सुविधा नसल्यामुले न्यायालयाने स्वत: सुमोटो याचिका दाखल करून घेत या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी ही एक चांगली चपराक म्हणावी लागेल. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या गावात असेलली ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त असून प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT