Chandrakant Khaire Sakal
महाराष्ट्र बातम्या

"शिंदे गटातील 10-15 आमदार आम्हाला फोन करून म्हणतात, साहेब आमचं चुकलं..."

दत्ता लवांडे

औरंगाबाद : शिंदे गटातील पैठणचे मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटातील आणखी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काल पैठणमध्ये बोलताना केला होता. त्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट करत शिंदे गटातील १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असून ते आम्हाला फोन करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

(Former MP Chandrakant Khaire On Shinde Group MLA)

"शिंदे गटातील काही आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि आम्हाला म्हणतात की, साहेब आमचं चुकलं... आम्हाला माफ करा. असं जवळपास १० ते १५ जण त्यांना माहितीये की आपण फक्त ५० जण आहोत आणि भाजपवाले ११६ आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करून आपल्याला आऊट करतील, त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत." असं चंद्रकांत खैरे माध्यमाला बोलताना म्हणाले आहेत.

"संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाहीये, मंत्रिपद कसं चालवायचं हेही त्याला कळत नाही, नशीबाने ते आमदार झाले आहेत." अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, संदीपान भुमरे यांनी काल पैठण येथे बोलताना ठाकरे गटातले २ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेतील सर्वांत जास्त नेते आमचे आहेत, मग तुम्हीच सांगा खरी शिवसेना कोणती आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला होता. त्यानंतर माजी खासदार खैरे यांनी शिंदे गटाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT