eknath shinde uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदेंचा मार्ग मोकळा; 37 आमदारांच्या सह्याचं पत्र पोहोचलं

पक्षातून वेगळे व्हायचे असेल तर दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ पूर्ण करावे लागते.

दत्ता लवांडे

Eknath Shinde News: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून आता अधिकृतरित्या सुटका होण्याची शक्यता आहे. कारण या कायद्याच्या नियमानुसार कारवाई होऊ नये यासाठी लागणाऱ्या दोन तृतीयांश शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार असून पक्षातून वेगळा गट स्थापन करायचा असल्यास किमान दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ पाठीशी असावे लागते. त्यासाठी शिंदे यांना ३७ आमदारांची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या सह्याचे पक्ष विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. यामध्ये सर्व ३७ बंडखोर आमदारांच्या सह्या आहेत.

दरम्यान या पत्रानुसार एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी आणि भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिंदे यांनी कालही दिला होता. मात्र कालच्या प्रस्तावात 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यात नितीन देशमुख यांच्या सही बाबत वाद होता. मात्र आता 37 आमदारांचे अधिकृतरित्या शिंदे यांना समर्थन मिळाले आहे. आता या पत्रानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत सेनेचे ३७ आमदार घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार पडण्याची चिन्हे आहेत त्यामुळे हा बंड रोखण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न केले जात आहेत. पण शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यानंतर आता राजकीय घडामोडींना काय वळण लागेल याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

IPL 2026: कोलकाताने अखेर रोखला हैदबादचा विजयरथ! रघुवंशीचं अर्धशतक, तर रहाणेची भक्कम साथ; KKR चं आव्हान जिवंत

SCROLL FOR NEXT