Eknath Shinde News | Raj Thackeray News Sakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन, बंडखोरांसमोर नवे पर्याय?

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही अद्याप पुढचा रस्ता स्पष्ट झालेला नाही. भाजपची याला फूस असल्याचा बातम्या समोर येत आहेत. त्यातच फडणवीस यांचं दिल्लीतील नेत्यांसोबत बैठक सत्र वाढलं आहे. (Eknath Shinde Calls Raj Thackeray)

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यास भाजपकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू आहे. मात्र, घटनात्मक बाबी अद्याप पेंडिंग आहेत. याशिवाय बंडखोर आमदारांच्या निलंबनावर शिवसेना ठाम असल्याने या प्रकऱणातील कायदेशीर पेचही वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटातर्फे भाजव व्यतिरिक्त पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दुसऱ्यांना फोन केल्याचं समोर आलंय.

सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल 40 आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांपैकी 40 आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. (Maharashtra Politics Updates)

मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला कोणतं वळण लागलं. याकडे पाहाणं गरजेचं आहे. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचं खरं हिंदुत्व हेच असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना त्यांचीच असल्याचंही शिंदे म्हणाले. सध्या राज ठाकरेही प्रखर हिंदुत्वावर भाषणं देत आहेत.

कायदेशीर पेच कायम

शिंदे गटाला एखाद्या पक्षात एंट्री करावी लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते. पण तो गट एखाद्या पक्षात विलिन करावा लागतो. सध्या शिंदे यांच्याकडे संख्या असली तरीही, 16 आमदारांवर कारवाईचा बडगा आहे. यामुळे शिंदे गटाकडून मनसेचा पर्याय आजमावण्याचा विचार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT