Eknath Shinde Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदे कंत्राटी मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे

भाजपचा उल्लेख चोरबाजार पक्ष

सकाळ वृत्तसेवा

भाजप राष्ट्रीय पक्ष आहे की, चोरबाजार असा बोचरा सवाल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच एका मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात केला आहे. यासोबतच एकनाथ शिंदेंवर कंत्राटी मुख्यमंत्री अशी खोचक टिका त्यांनी केली आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप शिंदे सरकारवर टीका केली आहे. या टिकेला एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिले. 

मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा उल्लेख 'कंत्राटी मुख्यमंत्री' असा केला होता. ते या पदावर किती काळ आहेत हे त्यांनाही माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला होता. विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी त्यावर भाष्य केलं.

काल माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला गेला. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट घेतले आहे. गोरगरिब जनतेचे अश्रू दूर करण्याचे कंत्राट घेतले आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कंत्राट घेतले आहे. बहुजनांच्या हितासाठी कंत्राट घेतले आहे. असंगाशी विसंगती करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा असेही शिंदेंनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT