Eknath Shinde, Uddhav Thacekray and Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : देवेंद्रजींनी मला सांगितलं एकनाथजी CM व्हा, तुम्ही त्यांनाच कलंक म्हणता; शिंदेंचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा मुद्दा चर्चीला जात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदीसाठी रस्सीखेचही सुरू झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आपल्या सैनिकांवर गुन्हे दाखल होत होते. आपल्या सैनिकांच्या केसाला धक्का लागणार नाही, याची काळजी आपण घेतली. सत्ता येते जाते पण सत्ता नसताना सुद्धा लोक तुमच्यासाठी थांबले पाहिजेत. दुसऱ्यांचे दुःख हलके करण्याचे काम जो करतो तो खरा माणूस, असही ते म्हणाले.

सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवले. बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवले, त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत गेलात. आमच्याकडेही सगळं आहे. आम्ही ते काढायला लागलो तर पाळता भुई थोडी होईल, अशा इशाराही शिंदे यांनी दिला.

शिंदे म्हणाले की, देवेंद्र यांना तुम्ही कलंक म्हणता. पण या देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखवून मला सांगितले की एकनाथजी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. याला मनाचा मोठेपणा लागतो. महाकलंक तर तुम्ही आहात, असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेची सत्ता घेऊ शकत होते. परंतु, त्यांनी तुम्हाला बिनविरोध महापालिका दिली. हा कृतघ्नपणा आहे, असंही शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT