महाराष्ट्र बातम्या

Maharashtra : अखेर जिल्ह्यांना मिळाले हक्काचे पालकमंत्री; पाहा यादी

जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Guardian Minister List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

असे असणार पालकमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव, दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिम, सुरेश खाडे- सांगली, संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव), रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर, अतुल सावे - जालना, बीड, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

दरम्यान, सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज अखेर यावर शिंदे सरकारने पालमंत्र्यांची नावे जाहीर करून हा तिढा सोडवला आहे.

जाहीर करण्यात आलेल्या पालमंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

SCROLL FOR NEXT