Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

'नकली वाघांना शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं महत्त्व काय समजणार'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वाघनखांच्या माध्यमातून वध केला होता.

सकाळ डिजिटल टीम

''त्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे सर्वप्रथम मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात आणण्यात आली आहेत. या शौर्याच्या प्रतिकाचा आम्हाला अभिमान आहे.’’

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh) नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे महत्त्व काय समजणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळून लगावला, तर त्यांची नियतही ही नकली आणि बुद्धीही नकली असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ब्रिटनच्या संग्रहालयातून आणण्यात आलेली वाघनखांचे लोकार्पण व शस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आराध्य दैवत आहेत. त्याकाळी अफजल खान स्वराज्यावर चालून आला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर त्याचा वाघनखांच्या माध्यमातून वध केला होता. त्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे सर्वप्रथम मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात आणण्यात आली आहेत. या शौर्याच्या प्रतिकाचा आम्हाला अभिमान आहे.’’

वाघनखे नकली म्हणणाऱ्यांनाही श्री. शिंदे यांनी यावेळी टोला लगावला. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे महत्त्व काय समजणार.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT