महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...''सर्व...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या 10 दिवसांपासून राज्यात सत्तांतर होणार होणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर आज अखेर राज्याला नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा चेहारा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde First Reaction After Taking Oath Of Maharashtra CM)

शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा हा विजय आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिलं आव्हान काय स्वीकाराल असे विचारले असता शिंदे म्हणाले की, राज्याचा विकास आणि राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याच काम राज्य सरकारकडून केलं जाईल. सर्वांनासोबत घेऊन आणि विश्वासात घेऊन काम केले जाईल. या कामामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसदेखील सोबत आहेत. त्यामुळे सर्वांच्या सोबतीने हा जो काही विकासाचा गाडा आहे तो पुढे नेण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला जाणार आहे.

‘ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले...’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा मान ठेऊन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी ट्विटही केले. यामध्ये त्यांनी ‘एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.’ असे ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Jalgaon News : जळगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला युद्धाची झळ! कच्चा माल मिळेना, उत्पादन निम्म्यावर आल्याने उद्योजक चिंतेत

२३ वर्षे डावललं! ‘टॉस, प्रेझेंटेशनमधून मला बाजूला ठेवलं’; रवी शास्त्री याचं नाव घेऊन माजी खेळाडूचा संताप

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

Ardhapur News : अर्धापूरात गारपीट-वादळी वाऱ्याचा तडाखा; ८ गावांतील २५० हेक्टर शेती बाधित, प्रशासनाची पाहणी

SCROLL FOR NEXT