Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

गुन्ह्याची चौकशी पोलिस करतील

रुपेश नामदास

Jitendra Awhad: रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "आव्हाड यांनी राजीनामा दिली की, नाही मला महित नाही, मात्र महिलेने जी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्याची चौकशी पोलिस करतील आणि त्यामध्ये जे काय समोर येईल त्यावर पोलिस कारवाई करतील, आमचे सरकार कोणत्याही राजकीय सूड भावनेतून कोणतीही कारवाई करत नाही, हे राज्य कायद्याचं आहे, आणि कायद्याने चालतं." असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषेदेत सांगितल की, मी सगळं सहन करेन पण ३५४ (विनयभंग) मान्य करणार नाही. ३५४ आणि ३७६ यासाठी माझा जन्म नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता पण हे मला सहन होत नाही, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT