Bullet Train Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bullet Train : शिंदे सरकारमुळे बुलेट ट्रेन होणार सुपरफास्ट, प्रलंबित कामाला हिरवा झेंडा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व प्रकारची मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये धावणार होती, परंतु महाराष्ट्रात भूसंपादनाच्या संथ गतीमुळे याच्या कामाला विलंब होत आहे. तसेच कोविड काळातही हा प्रकल्प लांबणीवर पडला होता.

महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 20 टक्के जमीन संपादित झाली असून, महाराष्ट्रात नुकत्याचा झालेल्या सत्ताबदलानंतर या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यात आता या प्रकल्पासंबंधी सर्व प्रकारच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हा प्रकल्प वेग धरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद ते मुंबई असा ५०८ किमीचा बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित आहे.

मुंबई- अहमदाबाद या बुलेट लाईनमध्ये एकूण 12 स्थानके असणार असून, यातील 8 स्टेशन गुजरातमध्ये तर 4 स्टेशन महाराष्ट्रात असणार आहेत. साबरमती ते वापी अशी एकूण 352 किमीची बुलेट ट्रेन गुजरातमध्ये असेल. या विभागातील 61 किलोमीटरमध्ये बुलेट ट्रेनचे खांब बसवण्यात आले असून 170 किलोमीटरवर काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Indian Railway : खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द! २३८ एसी लोकल रेक भारतीय रेल्वेच्या कारखान्यांतून

Pune News : समाविष्ट गावांना मोठा दिलासा! जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळणार ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची जागा

SCROLL FOR NEXT