Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा अधिकार नाही; केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे गटावर वारंवार हल्लाबोल करण्यात येत असून गद्दार म्हणून संबोधलं जातं. याला आता एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आला असून प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. (Shinde Group news in Marathi)

केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री परदेशात गेले की, इतरांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज देण्यात येतो. मग जर उद्धव ठाकरे आजारी असताना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे का दिला नाही. विश्वास ठेवला असता तर तुम्ही विश्वासघात केला असं म्हणू शकता. अन्यथा तुम्हाला विश्वासघातकी म्हणण्याचा अधिकार नाही.

ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वेचलं, त्याला तुम्ही मुख्यमंत्रीपद देऊ असं बोललात. तेव्हा ते म्हणाले की मला मुख्यमंत्रीपद नकोय. आम्ही ४० आमदारांनी सांगितलं होत की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची आघाडी तोडा. पण तुम्ही ऐकल नाही. आम्ही गुवाहाटीवरून परत येण्यास तयार होतो. पण ऐकल नाही.

दरम्यान आम्ही युती करत नाही, तोपर्यंत आम्हाला सांगा. पण तोपर्यंत सांगितलं नाही. युती झाली की दोन पक्षाचा प्रश्न येतो. आता भाजपसोबत आमची युती आहे. शिवसेनेसोबत आत्मियता होती. म्हणून मी आलो. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ऑफर होती, असंही केसरकर यांनी म्हटलं. यावर पुन्हा बोलेल पण एकनाथ शिंदे यांना गद्दार किंवा विश्वासघातकी म्हणणं आम्ही मान्य करणार नाही, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT