Eknath Shinde_Airbus
Eknath Shinde_Airbus 
महाराष्ट्र

Tata-Airbus project: टाटा एअरबस प्रकल्पावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; काय म्हटलंय जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रात येणारा 'टाटा एअरबस' प्रकल्प गुजरातमध्ये शिफ्ट झाला आहे. यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. यावरुन भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी टार्गेट केलं आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (Eknath Shinde group first reaction on controversy of Tata Airbus project)

टाटा एअरबसच्या प्रकल्पासंदर्भातील सर्व करार हे वर्षभरापूर्वी झाले आहेत. पण आता आगामी प्रकल्प महाराष्ट्रात यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प नागपूरहून गुजरातमध्ये शिफ्ट झाल्यावरुन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

यापूर्वी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क हे महाराष्ट्रातील दोन मोठे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले आहेत. यावरुनही विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं. त्यावेळी यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन केंद्र सकारकडून आपल्याला देण्यात आल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT