Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Latest Update: इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांना मोठी मदत, मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार पालकत्व

Sandip Kapde

Landslide News :  खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचं पालकत्व शिंदे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या आज इर्शाळवाडी येथे जाऊन या मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली.

नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत.

तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अजून ८६ जण अडकल्याची माहिती मिळत आहेत.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन इर्शाळवाडीतील मुलांची जबाबदारी घेण्यात येणार आहे. मुलांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत फाऊंडेशन सहकार्य करेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून येथील नागरिकांना घरे बांधून देण्याचे सांगितले आहे.

अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.

हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT