Shinde vs Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाच्या आमदारांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंची पहिली चाल

सकाळ डिजिटल टीम

राज्यात ठाकरे गट विरूद्ध शिंदे असा मोठा वाद महाराष्ट्रात सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून हा वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे. काल शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देत विधानपरिषद शिवसेनेचा प्रतोद नेमण्याची मागणी करण्यात आली. प्रतोद म्हणून विल्पव बजोरीया यांच्या नावाचा ठराव मंजूर झाल्याचे पत्रात सांगण्यात आले. 

उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना देखील शिंदे यांच्या प्रतोदाचा व्हीप लागू होणार का?, हे पाहावे लागणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंनी ही पहिली चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

ठाकरे गटाकडून प्रतोदपदासाठी विलास पोतनीस यांचे नाव मंजूर करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे उपसभापती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रतोदपदाचं महत्व काय?

प्रत्येक पक्षाचा एक प्रतोद असतो. सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम व्हिपने चालत असंत. सभागृहात मतदान करायचं असेल तर व्हिपला मोठं महत्व आहे. व्हिप हा सर्व पक्षाच्या सर्व आमदारांना बंधनकारक असतो. आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT