Eknath Shinde
Eknath Shinde 
महाराष्ट्र

आठवडाभरानंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर; म्हणाले, "मी शिवसेनेतच, हिंदुत्व पुढे नेणार"

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच गुवाहाटी येथील हॉटेलमधून बाहेर पडून माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहू. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेण्याचं काम करणार आहोत. आमचे पुढचे पाऊलं लवकरच तुम्हाला सांगितले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार असल्याचीही चर्चा रंगली असून, याठिकाणी ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसही दिल्लीला रवाना झाले असून, लवकरात लवकर मुंबईला जाणार असल्याचेही यावेळी शिंदे यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी असलेले सर्व आमदार हे स्वतःच्या मर्जिने आलेले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून काही आमदार आमच्या संपर्कात असलेल्याचा दावा खोटा असल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Eknath Shinde Latest News In Marathi)

दरम्यान, शिवसेनेकडून वेळोवेळी बंडखोर आमदारांमधील 15 ते 20 जण संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जर आमच्यासोबत असलेले आमदार जर शिवसेनेच्या संपर्कात असतील तर, त्यांनी त्या सर्व आमदारांची नावे स्पष्टपणे उघड करावीत. काल शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आदेश देताना बंडखोर आमदारांवर 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

यावेळी शिंदे म्हणाले की, आमच्या सर्व आमदारांची भूमिका आमच्या गटाचे अधिकृत प्रवक्ते दीपक केसरकर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. येथे आलेले सर्व आमदार हे स्वतःच्या मर्जीने येथे आले असून, लवकरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. आम्ही सर्व जण येथे आनंदात आहोत त्यामुळे कुणी काळजी करण्याची गरज नसून, लवकरच आम्ही मुंबईत परत येऊ असे शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार X Factor? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT