Shiv Sena MLAs Join With Rebel Leader Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

बंडखोर आमदारांची गोव्यात हेरगिरी? विद्यार्थिनींसह 3 जण ताब्यात

हरियाणामधील एकजण आणि उत्तराखंडमधील दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पणजी : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदार गोवा येथे थांबले असताना त्यांच्यावर हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक राष्ट्रवादी महिला विद्यार्थी संघटनेची विद्यार्थीनी सोनिया दुहान असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सोनिया दुहान, श्रेय कोठियाल आणि आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. फेक ओळखपत्रावर हॉटेलमध्ये थांबल्याच्या कारणावरून त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता.

(Eknath Shinde News Updates)

अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी सोनिया दुहान ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली असून सोनिया हीचे शरद पवार यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान हरियाणामधील एकजण आणि उत्तराखंडमधील दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. ते शिंदे गटातील आमदारांची हेरगिरी करत असल्याचा संशय असल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेशी बंड केले होते. ते आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसाम राज्यातील गुवाहटी येथे हलवला. त्यानंतर तिथे ७ दिवस थांबल्यानंतर सत्तास्थापनेची चिन्हे स्पष्ट झाल्यावर बंडखोर आमदार गोव्यातील ताज हॉटेलमध्ये आले होते. तेथे बंडखोर आमदार दोन दिवस होते. त्यावेळी आमदारांची हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हरियाणा आणि उत्तराखंड येथील असून ते फेक ओळखपत्रावर हॉटेलमध्ये थांबले होते.

हा प्रकार उघडकीस आल्यावर गोवा पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक महिला असून ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची विद्यार्थीनी असल्याचं समोर आलं आहे. तसंच अटक करण्यात आलेल्या सोनिया दुहान हिचे शरद पवार यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT