Eknath Shinde - Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळाबरोबर पावसाळी अधिवेशनाचाही मुहूर्त? अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याती शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता विस्ताराचा मुहुर्त ठरला असून पावसाळी अधिवेशनही १० ते १७ ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता आहे.

(Monsoon Session Updates)

पावसाळी अधिवेशनासंदर्भात विधिमंडळातील अधिकाऱ्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्रील एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे. पावसाळी अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या मंत्र्यांचा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या कामाला मुहूर्त मिळाला तर राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या कामाला वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT