Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू; मविआच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

रुपेश नामदास

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेवून विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहे. म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मला माहित आहे की, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये आणि भाजपला जे पाहिजे ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

भाजपला आमचं सरकार पाडायचं होतं त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला ते काम पुर्ण झालं. पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भाजपला ताकत देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी झाले आहेत आणि हे सरकार आल्यापासून शिंदे गटा सोबत भाजप देखील बदनाम होतोय. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच सांगू शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावर प्रतिक्रिया देताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्याशी तातडीनं संवाद साधला असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआची युती तुटावी असं मला कधी वाटलं नाही”, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले राऊत?

राऊत यांनी पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी. १ मे रोजी मुंबईत मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT