Sanjay Shirsath Sakal
महाराष्ट्र बातम्या

अन्याय झाल्यास बंड करा हे बाळासाहेबांनीच शिकवलं : संजय शिरसाठ

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या शिवेसनेच्या आमदाराचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

दत्ता लवांडे

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या शिवेसनेच्या आमदाराचा व्हिडिओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये शिवेसनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दलच्या नाराजीचा पाढा वाचून दाखवला आहे.

(Eknath Shinde Updates)

औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाठ यांनी या व्हिडिओतून आपली नाराजी व्यक्त केली आहे. "काल तुम्ही वर्षा सोडलं, तेव्हा लोकांनी तुमच्यावर फुलांची उधळण केली पण खरं तर लोकांना या गोष्टीचं दु:ख झालं पाहिजे होतं. येताना स्वागत करायला पाहिजे जाताना नाही." असं शिरसाठ म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना त्यांनी आम्हाला निधी न मिळाल्यावरून आपल्या भावनेला वाट करून दिली आहे.

"आम्ही तुम्हाला खूप वेळा पत्र लिहिले पण तुम्ही त्याला उत्तर दिले नाही. आजही तपासून बघा तुम्हाला पत्र सापडतील पण तुम्ही आम्हाला निधीबद्दल विचारू नका असं उत्तर द्यायचे." असा आरोप त्यांनी आपल्या व्हिडिओत केला आहे. तुम्ही आम्हाला बंडखोर म्हणू शकत नाहीत आम्ही कोणतीही चूक केली नाही, बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अन्याय झाल्यास बंड करा म्हणून, तुम्हाला मनातून आमचा अभिमान वाटत असेल." असं शिरसाठ म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. "काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आपल्याला संभाळणारेत? शक्य नाही." असा आरोपही त्यांनी या व्हिडिओतून केला आहे. आमची भूमिका तुम्हाला पटत नसेल पण तुम्ही मनातून आमच्या सोबत असाल, आम्हाला फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस नको आहे त्यासाठी आम्ही लढत आहोत." अशा प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT