Nana Patole Sakal
महाराष्ट्र बातम्या

"ये अंदर की बात है..." एकनाथ शिंदेंनी राजीनाम्याबद्दल नाना पटोलेंना दिले धन्यवाद | CM Eknath Shinde

दत्ता लवांडे

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस राहिले असून अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याला अखेर विरोधीपक्षनेता मिळाला आहे. काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार हे राज्याचे नवे विरोधीपक्षनेते झाले असून त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला आहे. यावेळी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे मोठं राजकारण घडलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्यावर टोला लावला. "नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मग सगळं झालं. हे राज्यासाठी चांगलं झालं, ये अंदर की बात है... लेकीन नाना हमारे साथ है हे मी बोलणार नाही" असं वक्तव्य करत नाना पटोले यांना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या सरकार बनवण्यासाठीच्या अडचणी दूर केल्यामुळे धन्यवाद दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

त्याचबरोबर "सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचे असते पण इच्छा पूर्ण होतात असं नाही. फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले पाहिजे. पण विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री होतो हा इतिहास आहे. मीही विरोधीपक्षनेता होतो, फडणवीस होते, दादा होते. निर्णय घ्यायला हिंमत लागते. सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, काम जोरात चालणार" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले आहेत.

नाना पटोले यांचा राजीनामा कसा ठरला एकनाथ शिंदे यांच्यासाठी फायद्याचा?

एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी होती. त्यामुळे पक्षाचा व्हीप न पाळलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात अडचणी आल्या. हे प्रकरण नंतर क्लिष्ट झालं आणि सुप्रीम कोर्टात गेलं. याचा फायदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 'त्या' १६ आमदारांना अप्रत्यक्षरित्या झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT