Eknath Shinde News | Maharashtra Political News Sakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंचं नवं ट्वीट; म्हणाले.. प्रभूंचे आदेश बेकायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेच्या प्रतोदपदी भारत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर आज शिवसेनेकडून आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. (Eknath Shinde New Tweet News)

या ट्वीटमध्ये शिंदे यांनी म्हटले आहे की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदेच्या या ट्वीटमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.

बंडखोर आमदारांना शिवसेनेचा कडक इशारा

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही उपस्थित आहेत. त्यात आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे (Shiv Sena) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना नोटीस पाठवून बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर रहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT