Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तुम्ही की शिंदे? फडणवीस म्हणाले आमच्याकडे...

रवींद्र देशमुख

मुंबई - मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय उलथापालथीवर खुलेपणाने भाष्य केलं. फडणवीस यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चेहऱ्याबाबतही महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. (devendra fadnavis news in Marathi)

2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्री चेहरा कोण असेल? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, आम्ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. आमच्याकडे हुकमी एक्का आहे. तो हुकमी एक्का म्हणजे मोदीजी. मोदींना समोर केलं की, तुम्ही कोणताही चेहरा द्या तो पुढे जातोच.

फडणवीस पुढं म्हणाले की, आज आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. निवडणुकीतही शिंदेच चेहरा असतील. आमच्या पक्षात एक संसदीय मंडळ आहे. हे मंडळच सर्व निर्णय घेतं. आम्ही सर्व त्याचे पालन करतो. पण काळजी करू नका 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असतील, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, आमचा आणि शिंदेजींचा समन्वय खूप जुना आहे. महाराष्ट्रात आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखतो. मी उपमुख्यमंत्री आहे, असे त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही, असही फडणवीसांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT