Eknath shinde Sandipan Bhumare Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवणार गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल

दत्ता लवांडे

पैठण : मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत संदिपान भुमरे शक्तिप्रदर्शन करणार असून आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

(Paithan CM Eknath Shinde Sabha Audio Clip)

आज मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या सभेसाठी महिलांना प्रत्येकी ३०० रूपये देण्याची मागणी करताना या क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. तर समोरचा व्यक्ती एका महिलेला २५० रूपये देण्यासंदर्भात बोलत असल्याचं समजत आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून 'सकाळ माध्यम' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही पैसे देऊन गर्दी केली जाणार असल्याचा आरोप केला आहे.

तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांसाठी भुमरे खोके खाली करत आहेत असं वक्तव्य करत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भुमरेंवर निशाणा साधला आहे. "तात्पुरते मुख्यमंत्री पैठणला येत आहेत आणि त्यांच्या सभेसाठी कुठून कुठून माणसं आणले जात आहेत. तालुक्याच्या बाहेरून प्रत्येकाला पैसे देऊन लोकं आणले जात आहेत. मला अनेक लोकांचे फोन आले आणि सांगितलं की प्रत्येकाला २५०-३०० रूपये दिले जात आहेत आणि गाडीत बसवलं जात आहे." असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेला गालबोट लावण्यासाठी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात असल्याचा आरोप मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर यासंदर्भात सायबर पोलीसांकडे तक्रार करणार असल्याचं विलास भुमरे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत गुढीपाडव्याचा जल्लोष; विकासकामांच्या चित्ररथाने वेधलं लक्ष

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

SCROLL FOR NEXT