Eknath Shinde on navaneet rana Ravi Rana Matoshri mumbai Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंची सात वाजता पत्रकार परिषद; कोणता बॉम्ब फोडणार?

त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर साधारण 40 आमदारांसह बंड केलेलं शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde सध्या गुवाहटी येथे असून, संध्याकाळी सात वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिंदे नेमका कोणता बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादादरम्यान, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Eknath Shinde News In Marathi)

एकनाथ शिंदेंचं नवं ट्वीट; म्हणाले.. प्रभूंचे आदेश बेकायदेशीर

शिवसेनेच्या प्रतोदपदी भारत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर आज शिवसेनेकडून आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये शिंदे यांनी म्हटले आहे की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदेच्या या ट्वीटमुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.

बंडखोर आमदारांना शिवसेनेचा कडक इशारा

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही उपस्थित आहेत. त्यात आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे (Shiv Sena) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना नोटीस पाठवून बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर रहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितलं; उस्मान तारीकबद्दलही म्हणाला...

Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीला फक्त 5 मिनिटांत काढा सुंदर रांगोळी! अंगणाची वाढेल दुप्पट शोभा

Devendra Fadnavis: ''असं जोडे चाटणं मी या जन्मात बघितलेलं नाही'', मुख्यमंत्री फडणवीस भडकले

Horoscope Prediction : फक्त आठ दिवसात बदलणार 4 राशींचं नशीब ! शुक्राच्या कृपेने होणार भरभराट

Horscope : उद्या 15 फेब्रुवारी! 'या' 4 राशीच्या लोकांची लॉटरी; अचानक मिळणार पैसे, खूप दिवसांपासूनची अपूर्ण इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT