Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

"उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी, मदत कधी मिळते हे त्यांना माहिती नाही"

दत्ता लवांडे

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सध्याच्या सरकारवर टीका केली होती. यानंतर शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Ramdas Kadam On Uddhav Thackeray)

औरंगाबादचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सरकारला खडसावलं होतं. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत का मिळत नाही? असा सवाल करून त्यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर रामदास कदम यांनी "उद्धव ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे, त्यांना साध्या गोष्टी कळत नाहीत" असा टोला लावला आहे.

"उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, त्यांना माहिती पाहिजे की पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करता येत नाहीत. आणि पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही हे त्यांना माहिती पाहिजे, त्यांना हे माहिती असतं तर त्यांनी अशी टीका केली नसती, मला असं वाटतंय की, त्यांचा अभ्यास कमी आहे" असं रामदास कदम म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावरचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमींवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT