Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र

संजय राऊतांचे सख्खे भाऊ सेनेची साथ सोडणार? राऊतांचे स्पष्टीकरण

दत्ता लवांडे

Eknath Shinde: राज्यातील राजकीय वातावरणाला सध्या वेगळं वळण लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत तब्बल ३९ आमदारांसह शिवसेनेला बंड केलं आहे. ६ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती चालूच आहे. उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.

त्यामुळे आता शिवसेनेत फक्त चार मंत्री शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सख्खे भाऊ शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. संजय राऊतांचे सख्खे भाऊ सुनिल राऊत गुवाहटीला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

(Eknath Shinde News)

दरम्यान "माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेशी बेईमानी करणार नाही." असं वक्तव्य संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण देताना केले आहे. सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला असून सुनिल राऊत हे शिंदे गटाला मिळण्यासाठी नाही तर शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

२०१९ साली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी होती असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ते शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. आपल्याला सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याचं शल्य त्यांच्या मनात आहे का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

दरम्यान शिंदे यांच्याकडे सामंत यांना धरून शिवसेनेचे एकूण ३९ आमदार आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत. तर विधानसभा उपाध्यक्ष्यांकडून १६ आमदारांवर कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता हा राजकीय वाद कोर्टात गेला आहे. शिंदे गटाने याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT