लोकसभा निवडणुकांसाठी भाजप पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी भाजप पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. esakal
महाराष्ट्र

भाजपमुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या सुपुत्राची जागा धोक्यात ?

धनश्री ओतारी

लोकसभा निवडणुकांसाठी भाजप पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 16 लोकसभा मतदार संघावर भाजप वर्चस्व गाजवणार असल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. दरम्यान, कल्याण आणि पालघर या दोन लोकसभा जागा शिंदे गटाकडे आहेत. या लोकसभा जागेवर भाजप दावा सांगण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. अशातच भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी कल्याणमधून कमळ निवडून गेलं पाहिजे. असं मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची जागा भाजपमुळे धोक्यात असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे.(Eknath Shinde Shrikant Shinde kalyan palghar loksabha voters claim by bjp)

संजय केळकर यांनी माध्यमांसी संवाद साधताना १६ जागेंवर दिल्लीला कमळ निवडून गेलं पाहिजे असं म्हटलं आहे. सर्व बाबतीमध्ये आपली तयारी आत्तापासून असली पाहिजे. आणि त्या दृष्टीने हा जो मतदार संघ आहे. याची बांधणी जी आहे ती भाजपला अभिप्रेत आहे. ह्याच्या बााजूला भाजपचा देखील मतदारसंघ आहे. जिथे भाजपचा एकही खासदार नाही.

त्यामुळे राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडुन गेले पाहिजे दिल्लीला, हे प्लँनिग सहा महिन्यांपूर्वी झाले आहे,त्या दृष्टीने काम चालू झालेलं आहे. असा खुलासाही आमदार केळकर यांनी केला आहे.

केळकर यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची जागा भाजपमुळे धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. कल्याण डोंबवलीतून मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. तर पालघरमधून राजेंद्र गावित खासदार आहेत. यापूर्वी गावीत भाजपमध्येच होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने पालघरची जागा आणि उमेदवार शिवसेनेला दिली. आता प्रश्न उरतो कल्याणचा ही जागा भाजपकडे गेली तर श्रीकांत शिंदेंचा राजकीय पुर्नवसन कसं होणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात असून भाजपाने येथे देखील मोर्चेबांधणी आखल्याने भाजपा येथे आपला उमेदवार उभा करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याण आणि पालघर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्र्यांचा लवकरच दौरा होणार असून भाजपाने त्यापद्धतीने आखणी देखील केली आहे.

कल्याण लोकसभा क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर या शहरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे 11 ते 13 सप्टेंबर असा तीन दिवसीय दौरा करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात आज बाईक रॅली

SCROLL FOR NEXT