Eknath Shinde News | Shiv Sena News Sakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही कोणाला घाबरवताय? बनवाबनवी अन् कायदा आम्हाला कळतो; शिंदेंचं प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. दरम्यान शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. यानंतर बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी नवं ट्वीट करत याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? असा थेट सवाल केला आहे, ते पुढे म्हणाले आहेत की, तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत असे म्हणटले आहे.

धमक्यांना भीक घालत नाही..

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Kolhapur : मिशन जिल्हापरिषद! कार्यकर्ता नाही वारदार महत्वाचा, कोल्हापुरात नेत्यांकडून मुलगा, सून, पुतण्या, रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

Virat Kohli: भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विराट कोहलीचे उत्तर, बरंच काही बोलून गेला! पाहा शास्त्री-गिलख्रिस्टने घेतलेली मुलाखत Video

Maharashtra Politics: ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा चर्चा! भाजपने शिंदे सेनेला डिवचले, महायुतीमध्ये संघर्ष वाढला

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

SCROLL FOR NEXT