Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray-Shiv Sena : शिवसेना-शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम; 'या' दिवशी सादर करा कागदपत्रं

सकाळ डिजिटल टीम

धनुष्यबाण निवडणुक चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा निर्णय निवडणुक आयोग लवकरच घेणार आहे. यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. (Eknath Shinde Uddhav Thackeray has been given a deadline of October 7 to submit his statement by the Election)

२३ सप्टेंबरला ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला वेळ वाढवून दिली आहे. २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर शिवसेनेकडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेची ही मागणी मान्य करत ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपलं म्हणणं ७ ऑक्टोबरपर्यंत मांडावं लागणार आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षामुळे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यापैकी कोणा एकाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागण्याची शक्यता आहे. तसेच खरी शिवसेना कोणाची, याबाबत कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आहे. त्यामुळे काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT