uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेला मोठं खिंडार; आणखी 3 सेना आमदार रातोरात सुरतला पोहोचणार

शिवसेनेचे आणखी तीन आमदार सुरतला रातोरात रवाना होणार आहेत.

दत्ता लवांडे

Eknath Shinde: शिवसेनेचे आणखी तीन आमदार सुरतला रातोरात रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत पाच अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. असे सर्वजण मिळून आठजण सुरतला जाणार असल्याचं कळतंय. हे आठही आमदार रात्रीच सुरतला पोहोचणार असून त्यानंतर ते गुवाहटीला रवाना होतील असं सांगितलं जातंय. पण अजूनही या आठ आमदारांची नावे समोर आली नाहीत.

दरम्यान, अपक्ष आमदार गिता जैन आणि जोरगेवार हे देखील गुवाहटीतील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून अपक्ष आमदारांचीही शिंदेंच्या गटाकडे रीघ लागली आहे. त्यानंतर शिंदेंच्या गटातील आमदारांची संख्या आता वाढत आहे.

अपक्ष आमदार किशोर जोडगेवार आणि आमदार गीता जैन देखील गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये नुकतेच पोहोचले आहेत. आणि आज मुंबईतून परत पाच अपक्ष आणि शिवसेनेचे तीन असे मिळून आठ आमदार सुरतला पोहोचणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर महाविकास आघाडीकडून सरकार टिकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, शिवसेनेने आज बंडखोरी केलेल्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. तर शरद पवारांनी बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागेल अशा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपच्या नारायण राणे यांनी त्यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले होते. शिवसेनेने आमदारांच्या निलंबनाच्या मागणीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेनेला इशारा केला आहे.

या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या ४१ आणि अपक्ष सात मिळून ४७ आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता परत शिवसेनचे तीन आणि पाच अपक्ष आमदारांची भर पडणार आहे. त्याचबरोबर नुकतेच दोन अपक्ष आमदार गुवाहटीला पोहोचले असून शिंदेच्या गोटातील आमदारांची संख्या वाढत आहे. या सगळ्या नाट्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

Latest Marathi News Updates : राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आता पोस्टमनही म्युच्युअल फंड विकणार! पोस्ट ऑफिस Mutual Funds चे नवे हब बनणार; ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

Mumbai-Goa Highway Traffic Jam : कोकणात जाणाऱ्यांची लगबग; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लाब रांगा...

जन्माष्टमीला बाळाला कृष्ण केलं, तीन दिवसांनी नदीत उडी; चौथ्या दिवशी पतीने बाळासह तिथंच घेतली जलसमाधी....

SCROLL FOR NEXT