Sanjay Raut
Sanjay Raut  sakal
महाराष्ट्र

शिंदे गटाचे नेते गोगावलेंचे राऊतांना आव्हान; म्हणाले, सुरक्षेविना येऊन दाखवा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) रायगडमधील महाड येथे सभा घेणार आहेत. मात्र शिंदे गटाचे शिवसेनेचे बंडखोर नेते विकास गोगावले यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे. राऊत यांनी आगामी सभेसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांविना महाडमध्ये यावे, असे आव्हान गोगावले यांनी त्यांना दिले. ते पुढे म्हणतात, संजय राऊत येथे विनासुरक्षेचे आल्यास त्यांना शिवसैनिक त्यांना 'प्रसाद' देण्यास मागे पुढे पाहणार नाही. (Eknath Shinde Vikas Gogavale Challenge Sanjay Raut Come Without Security)

वास्तविक, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंग आता सुटला आहे. २९ जून रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी संजय राऊत यांचे एक ट्विट खूपच व्हायरल झाले होते. यात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले होते, की कुठपर्यंत गुवाहाटीत लपणार? चौपाटीत यावेच लागेल. (Maharashtra Politics)

दुसरीकडे आता शिंदे गटाचे विकास गोगावले म्हणाले, की त्यांना मी सुरक्ष कर्मचाऱ्यांविना महाडमध्ये येण्याचे आव्हान देतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मला आशा आहे, की दोन्ही नेते महाराष्ट्रासाठी चांगले काम करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT