Eknath Shinde News | Shiv Sena News
Eknath Shinde News | Shiv Sena News Sakal
महाराष्ट्र

ही दारं गेल्या अडीच वर्षांपासून आमदारांसाठी बंद होती, एकनाथ शिंदेंनी पत्रच शेअर केलं

सकाळ डिजिटल टीम

सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सेनेला मोठं भगदाड पाडलं. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याचं स्पष्ट झालंय. (Maharashtra Politics)

सध्या एकनाथ शिंदे गुवाहाटीत हॉटेलवर आहेत. त्यांनी नुकतचं ट्वीट केलं असून आमदारांच्या भावनांबद्दल भाष्य केलंय. काल मातोश्रीची दारं खऱ्या अर्थाने सर्वसमान्यांसाठी उघडली. गेल्या अडीच वर्षांपासून आमच्या सारख्या आमदांरांनाही ही दारं बंद होती. हे पाहून आनंद झाला, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे. (Maharashtra Political Crisis)

आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या आणि विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवाववर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती.

हेच सो कॉल्ड चाणाक्य-कारकून बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकार काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात. पण आमच्यासाठी तर सहाव्या मळ्याचाही प्रश्न आला नाही. कारण मुख्यमंत्री मंत्रालयात गेलाच नाही.

मतदारसंघातील कामं, इतर प्रश्न, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायंचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय, असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनसात बंगल्यावर गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन चार लाख मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत होती. हे योग्य आहे का?, असा थेट सवाल शिंदे यांनी शेअर केलेल्या शिरसाठ यांच्या पत्रात विचारण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT