Rain In 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain In 2024: यंदाच्या वर्षी देशात पडणार धो-धो पाऊस; ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याचा चांगला परिणाम

Rain In 2024: देशात मागील वर्ष, म्हणजे २०२३ हे सर्वांत उष्ण ठरले. त्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय होता. त्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्याचे दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा

पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने रविवारी दिली आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याने देशातील नैॡत्य मोसमी पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा वेगवेगळ्या हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे.(El Nino conditions weakening raise hopes of bountiful monsoon in India Meteorologists)

देशात मागील वर्ष, म्हणजे २०२३ हे सर्वांत उष्ण ठरले. त्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय होता. त्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी पावसाने दडी मारली. बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे हिवाळ्यातच शहरांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज दिलेली माहिती आनंदाची लाट निर्माण करणारी आहे. हवामान खात्याकडून ‘एल निनो’चे बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

येत्या जूनपर्यंत उष्ण पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता कमी होऊन तो सामान्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या जून ते ऑगस्ट या दरम्यान प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाह ‘ला निना’ची स्थिती येईल. त्याचा परिणाम होऊन यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात मॉन्सून चांगला राहील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

मात्र, ‘स्प्रिंग प्रेडिक्टेबिलिटी बॅरियर’चा संदर्भ देत हवामान अंदाजात काही प्रमाणात कमी-जास्त होऊ शकते, असा सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस मॉन्सूनचा असतो. शेतकरी, शेती उत्पादन आणि अर्थव्यवस्था यांच्यासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरतो.

तज्ज्ञांचे म्हणणे

एप्रिल-जूनपर्यंत ‘एल निनो’ सामान्य असण्याची शक्यता ७९ टक्के आहे आणि जून-ऑगस्टमध्ये ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता ५५ टक्के आहे, अशी माहिती ‘युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एनओएए) गेल्या आठवड्यात दिली. युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नेदेखील ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे, याला पुष्टी दिली आहे.

भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले, ‘‘सध्याच्या हवामान स्थितीबाबत निश्चित भाष्य करता येत नाही. कारण, काही हवामान प्रारूपे ‘ला निना’चा अंदाज देत आहेत, तर काही ‘एल निनो’ सामान्य राहील, असेही सांगत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT