Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: शिवसेनेचं चिन्ह शिंदे गटाला गेलं तर ठाकरे गटाचा प्लॅन 'बी' अन् 'सी' तयार?

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला

रुपेश नामदास

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेतील जवळपास ४० आमदार फोडून भाजप सोबत नव समीकरण जुळवलं. त्यांनंतर शिंदे गटाने पक्षावर आणि पक्ष चिन्हावरच दावा केला. त्यामुळे ठाकरे-शिंदे यांच्यात कायदेशीर बोलणी चालू झाली.

परिणामी शिवसेनेत दोन गट तयार झाले एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे गट, यामुळे खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाने केला. या दोन गटाचा वाद अखेर कोर्टात गेला.

पक्ष चिन्हाचा वाद निवडणुक आयोगात तर पक्षाच्यानावाचा वाद सुप्रिम कोर्टात. दरम्यान येत्या 17 जानेवारीला निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय देणार आहे. त्यामुळे दोन्ही गट गॅसवर असणार. मात्र उद्धव ठाकरे गटाने चिन्हा शिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जर 17 जानेवारीला निवडणूक आयोगाने चिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाने दोन प्लॅन तयार ठेवले आहेत. एक म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे तर दुसरा प्लॅन म्हणजे थेट जनतेतूनच पक्षाचं चिन्ह आणि नाव मागवणार आहे. अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

सादिक अली खटल्यानुसार निकाल लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाने निर्णयाचा वाट न बघता तयारी सुरू केली असल्याचे सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Malegaon News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये अमेरिका इराण युद्धाची झळ,गॅससाठी नागरिकांची मोठी गर्दी

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

SCROLL FOR NEXT