election commission in indian constitution Sakal
महाराष्ट्र बातम्या

Election Commission : विधानसभा तोंडावर असताना निवडणूक आयोगाची राज्य शासनावर नाराजी; मुख्य सचिवांना लिहिलं पत्र

vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने आयोगाने व्यक्त तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर चार राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं.

संतोष कानडे

Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल तीनवेळा स्मरणपत्र देऊनही निर्णय न घेतल्याने आयोगाने ताशेरे ओढले आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आयोगाने शासनाची खरडपट्टी काढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने आयोगाने व्यक्त तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर चार राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं.

यामध्ये एकाच जागी तीन वर्षांपेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने आयोगाने दर्शवली नाराजी व्यक्त केली आङे. दिलेल्या कालावधीत या सगळ्यांची माहिती का दिली नाही, हे स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलंही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहे. राज्य शासन विधानसभा निवडणुकीवरुन गंभीर नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT