Society Election
Society Election Esakal
महाराष्ट्र

Political: विकास होत नसल्याने 80 वर्षीय आजी-आजोबा निवडणूक रिंगणात

सकाळ डिजिटल टीम

सांगली : मिरज (Miraj) तालुक्यातील बेडग गावात सध्या सोसायटीची निवडणूक (Election) लागली आहे. 13 उमेदवारासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीत स्वाभिमानी परिवर्तन शेतकरी पॅनेलचे वयोवृद्ध उमेदवार उभे केले आहेत. सोसायटीध्ये सत्ताधाऱ्यांनी कोणताही विकास केला नाही. कर्ज वाटप केली नाहीत त्यामुळे सोसायटीचे जुने सभासद ज्याचे वय आता 80 च्या वर आहे. ते रिंगणात उभे राहिले आहेत. यामध्ये एक आज्जी आणि तीन आजोबा उमेदवार म्हणून रिंगणात उभे केले गेले आहेत. 80 वर्षावरील आजी-आजोबांनी तरुणांना आव्हान दिल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

बाबुराव लक्ष्मण बुरसे वयवर्ष (85), धोंडीराम अंतू नलवडे वय (83) , शंकर गुरुलिंग कंगुणे वय (80), धोंडूबाई रघुनाथ पाटील वय (72 ) तर दत्तात्रय रामचंद्र खरात वय (68 ) अशी उमेदवारांची नावे आहेत. सांगली जिल्ह्यातील (Sangli District) सोसायटीची निवडणूक चांगलीच गाजत आहे. कालपासून सोसायटीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलाच जोर लावला आहे. अनेक मुद्द्यावर गावची निवडणूक चांगलीच रंगत धरली आहे. बेडगमध्ये ही काल पासून प्रचाराला सुरवात झाली आहे. येत्या 20 तारखेला मतदान आहे. संध्याकाळी लगेच निकाल असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण बेडग मध्ये वयोवृध्द उमेदवाराची जोरदार चर्चा आहे.

एकीकडे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे 80 वर्षाचा योद्धा म्हणून निवडणूक लढवत होते. आणि त्यांनी ते करून दाखवले. तर दुसरीकडे ऐंशी वर्षाचे आजी आणि आजोबा आता या सोसायटीमध्ये अशीच काहीतरी कामगिरी करून दाखवणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बेडग (Bedag) गावच्या सोसायटीला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र विकास गावचा झाला नाही. विरोधक पॅनलमध्ये आजची तरुण पिढी आहे. पण हे वयोवृद्ध लोकांना जुमानत नसल्याने वयोवृद्ध उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: आज तुमच्या यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

Yoga Tips : महिलांच्या प्रत्येक समस्येवर रामबाण आहे बद्धकोणासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Brain Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला ५ वर्षीय मुलीचा जीव, जाणून घ्या Naegleria Fowleri बद्दल सविस्तर

SCROLL FOR NEXT