Praful Patel
Praful Patel 
महाराष्ट्र

Rajyasabha Election: तीन वर्षे शिल्लक असताना प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर; राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे आश्चर्य

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी ६ नावे देण्यात आली आहेत. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. (Praful Patel from NCP will go to Rajya Sabha Information given by Sunil Tatkare ajit pawar)

तांत्रिक बाबीचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे. ते १०० टक्के निवडून घेतील. उद्या प्रफुल्ल पटेल खासदारकीचा राजीनामा देतील, कारण ते सध्या खासदार आहेत. त्यानंतर ते उद्या अर्ज दाखल करतील. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ते उद्या निर्णय देतील. तांत्रिक गोष्टींचा विचार करुनच पटेलांची उमेदवारी दाखल करत आहोत, असं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं.

१० जणांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी याची विनंती केली होती. पण, सारासार विचार करुन प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं तटकरे म्हणाले. पटेलांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण, त्यांचा अद्याप तीन वर्षांचा राज्यसभचा कार्यकाळ शिल्लक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बुचकळ्यात टाकणारा निर्णय

प्रफुल्ल पटेल यांची तीन ते साडेतीन वर्षे शिल्लक असताना पवार गटाने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. एका जागेसाठी अनेकजण इच्छुक होते. आता कुणाला नाराज न करण्यासाठी हा निर्णय घेतलेला असू शकतो. प्रफुल्ल पटेल यांची जागा रिक्त झाल्यानंतर त्यासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इतर नेत्यांचा विचार केला जाऊ शकतो. अजित पवार गटाने वाद टाळण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतयं. तसेच एका जागेसाठी येत्या काळात उमेदवारांमध्ये आशा पल्लवित ठेवण्याचं काम करण्यात आलं आहे.

काहींचा असाही कयास आहे की, शरद पवार गटातील एका मोठ्या नेत्याला राज्यसभेवर पाठवले जाणार होते. मात्र, तो नेता आला नाही. असे असले तरी पुढे देखील त्याला संधी देण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांना तीन वर्षे शिल्लक असताना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. पटेलांच्या राजीनाम्यामुळे लोकसभेनंतर राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होईल. त्यावेळी एका नेत्याला (शरद पवार गटातील) संधी दिली जाऊ शकते.

सहा उमेदवार जाहीर

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा उमेदवार पाठवण्यात आले आहेत. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT