Electric scooter battery Blast death 7 year old boy  esakal
महाराष्ट्र बातम्या

Electric Bike : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीने घेतला ७ वर्षीय चिमुरड्याचा जीव

सकाळ डिजिटल टीम

ई स्कुटरच्या बॅटरीच्या झालेल्या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसईत घडली. वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाला. (Electric scooter battery Blast death 7 year old boy )

शब्बीर शाहनवाज अन्सारी, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील रामदास नगर इथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबला रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे बॅटरीचा भीषण स्फोट झाला.

त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले. शब्बीर हा 70 ते 80 टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वी अनेकवेळा चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT