Mahavitaran esakal
महाराष्ट्र बातम्या

Electricity Employee : वीज कामगारांच्या वेतनात वाढ; एक मार्चपासून होणार लागू

वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ऊर्जा विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एक मार्चपासून होणाऱ्या वेतनवाढीचा ६८ हजार ४५ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

‘सह्याद्री’ अतिथी गृह येथे वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यात २५ टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करिता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा पाचशे रुपये भत्ता एक हजार रुपये करण्यात आला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT