Exam
Exam Sakal
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटी’त मराठी भाषेचा हवा पर्याय

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेत (ECT Exam) मराठी भाषेचा (Marathi Language) समावेश नसल्याचे त्याचे पडसाद आता उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) MNS Student) ‘सीईटी’त मराठी भाषेच्या पर्यायाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. तसेच सीईटी परीक्षेत मराठीचा समावेश न केल्यास परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा विद्यार्थी सेनेने दिला आहे. (Eleventh Admission CET Marathi Language Option)

दहावीची परीक्षा रद्द केल्याने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या चार विषयांच्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आधारे सीईटी होणार आहे. मात्र त्यामध्ये मराठीचा समावेश करण्यात आलेला नाही. हे अन्यायकारक असून राज्यातच मराठीची परवड होत आहे. हे सहन केले जाणार नाही. मराठी भाषेचा पर्याय न दिल्यास आंदोलन करून परीक्षा हाणून पाडू, असा इशारा विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे. यादव यांनी परीक्षेत मराठी विषयाच्या समावेशाबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे.

‘अकरावी सीईटीच्या परीक्षेसाठी चार विषयांची निवड करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये मराठीचा समावेश नाही. हे अजिबात सहन केले जाणार नाही. मराठी भाषेचा पर्याय न दिल्यास आंदोलन करण्यात येईल.’’

- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT