महाराष्ट्र

रहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात!

विजय गायकवाड

नालासोपारा - राज्यातील गावागावांतील ग्रंथालयांची कपाटे त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांनी सजली आहेत. ते रहस्यकथांचे सम्राट, ‘गोलंदाज’, ‘शिलेदार’, ‘मेजर भोसले’ यांसारख्या अफलातून नायकांचे जनक गुरुनाथ नाईक... आज आयुष्याच्या संधिकाली, आजाराने जर्जर झालेला देह घेऊन वणवण फिरत आहेत. लक्षावधी मराठी जनांना अमूल्य वाचनानंद देणारा हा लेखणीचा बादशहा आज दारिद्य्राच्या वेदना आणि उपेक्षेचे सल सोसत कसाबसा दिवस कंठत आहे.

चाळीस वर्षे अखंड लिहिता हात होता त्यांचा. १९५७ ते १९६३ या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर या नावानेही लिखाण केले. पुढे १९७० ते १९८२ या काळात तब्बल ७२४ कथा-कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी. २५० शिलेदार कादंबऱ्या, १५० गोलंदाज कथा असा ऐवज दिला त्यांनी. मराठी समीक्षकांनी त्या काळीही त्यांना उपेक्षेने दुर्लक्षित केले. 

आज वयाच्या ७९ व्या वर्षी राहायला घर नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही, अशा अवस्थेत हा साहित्यिक अखेर वसईतील त्यांचे जुने स्नेही विनायक निकम यांच्याकडे गेल्या गुरुवारी आले... निदान चार घासांची, डोक्‍यावरील छपराची सोय तरी होईल या अपेक्षेने. शनिवारी साहित्यप्रेमींच्या वसई नगरीतील एका रस्त्यावर ते असेच वणवण फिरताना आढळले. सोबत त्यांच्या  पत्नी होत्या.

शिवसेनेची मदत!
गुरुनाथ नाईक यांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे आली आहे. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नाईक कुटुंबीयांची भेट घेतली. सरकारच्या माध्यमातून नाईक यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळामार्फत दिले. नाईक यांना घर उपलब्ध झाले नाही, तर त्यांची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT