Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : पोलाद प्रकल्पामुळे रोजगार;फडणवीसांना विश्वास,सूरजागड इस्पात स्टीलचे भूमिपूजन

‘येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून ऐंशी लाख टन; तर, लॉईड्स प्रकल्पातून चाळीस लाख टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात ३० टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : ‘‘येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून ऐंशी लाख टन; तर, लॉईड्स प्रकल्पातून चाळीस लाख टन पोलाद उत्पादन होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात ३० टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून होणार आहे.

त्यामुळे येथे उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून नक्षलवादामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे जात असल्याचे चित्र आपणास दिसेल,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘सूरजागड इस्पात स्टील प्रकल्पा’चे बुधवारी फडणवीस यांच्या हस्ते

अहेरी तालुक्यातील वडाळापेठ येथे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ‘‘गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्‍या उद्योगात ८० टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

त्याचा स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जल, जमीन, जंगल हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आदिवासींचे दैवत असलेल्या ठाकूर देवाजवळ कोणत्याही प्रकारचे उत्खनन होणार नाही. चामोर्शीतसुद्धा ३५ हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून २० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT