Nitin Raut
Nitin Raut Team eSakal
महाराष्ट्र

महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एक निलंबित

सुधीर काकडे

महावितरणमधील (MSEB) भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आता कठोर भुमिका घेतली आहे. राऊत यांनी आता अशा अधिकाऱ्यांविरोधात चांगलाच बडगा उगारला आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार (Sumit Kumar) यांना राऊत यांनी निलंबित केलं आहे. या अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसंच राऊत यांनी यांनी अधिकाऱ्यांनाही कठोर संदेश दिले आहेत.

दरम्यान, निलंबित केलेल्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. महावितरणमधील मीटर रीडिंग एजन्सी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करणे, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावणं असे आरोप संबंधीत अधिकाऱ्यावर आहेत. दरम्यान, या धमकीची रेकॉर्डिंग क्लिप देखील उपलब्ध आहे. मात्र, क्लिप उपलब्ध असूनही ठोस कारवाई होत नव्हती. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी पद मिळवण्याचं काम हा अधिकारी करत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT